भजनी मालिका
← भजनांकडे परत

किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख

kiti karun shok | pudhen vadhe duhkhen duhkh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥१॥ आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥ पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥२॥ तुका म्हणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥