भजनी मालिका

भजने

अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वतां पंढरीये ॥१॥ अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥ अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य सप्तपुर्‍याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥ अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥ अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥ प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अनुभवाचे रस देऊं आर्त भूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥१॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । स्वहित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभवें अनुभव अवघा चि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥ पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभवें कळो येते पांडुरंगा । रुसावे ते कां गा तुम्हांवरी ॥१॥ आवरीता चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझे मज ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अनुभवें नाम गाताती गणिका । मोक्षपद देखा प्राप्त जालें ॥१॥ उलट्या अक्षरी वाल्हा तो तरला । उद्धार तो केला चोखियाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ