भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवें अनुभव अवघा चि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं

anubhaven anubhav avagha chi saghila | tari sthiravala man thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवें अनुभव अवघा चि साघिला । तरि स्थिरावला मन ठायीं ॥१॥ पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥ एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥३॥