भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें

anubhaven alen anga | ten ya jaga detasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥ नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥ उतरूनि दिसे कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥ तुका म्हणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥