भजनी मालिका

भजने

एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥१॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥ ऐका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरीकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥ जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अबद्ध नरक जोडे ॥१॥ शुद्ध अशुद्ध हें विठोबाचें नाम । जपतां घडे सकाम मोक्ष मुक्ति ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकी एकादशी करितां काय वेंचे । उपवासी राहतां काय वेंचे ॥१॥ एक तुळसीदळ वाहतां काय वेंचे । पाउलीं वंदितां काय वेंचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकी पुढें एक सांगतीं गार्‍हणीं । लिहितां पृथ्वीं न पुरेचि धूणी ॥१॥ म्हणे यशोदा कृष्णा काय हें कैसें । खोडी नको करुं हरि बोलतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकी म्हणती हरि आमुचा सोयरा । दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥ तिजी म्हणे काली आणिला पोसणा । चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥ तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे ॥१॥ एकीनें सांगितलें दुजीनें परिसलें । प्रपंचा पुसलें तेणें रुपें ॥२॥

एकी म्हणे हरि आमुचा शेजारीं । दुजी म्हणे मित्र माझा ॥१॥ तिजी म्हणे सखा आमुचा जिवलग । चौथी म्हणे नि:संग सदांचा हा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकीं येकटेंचि असोनि एकला । विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला । जया परीवो तैसाचि गमला । नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या बोलति परस्परीं । करुनि विस्मय आपुलाल्या अंतरीं । विश्वलाघवीया हाचि चराचरीं । नेणों महिमा यांसी म्हणों व्यभिचारी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥ पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणतां हरी ॥धृ ॥ नव्हें काई बाई तेथें झालें एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आलें जाण ॥ एकी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ