भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश

ekapasuni jhalen vishva | vishvamajin ekachi ansh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥ जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥ शून्या नुठितां शून्यपणें । कैंचें एका एक होणें ॥३॥ निळा म्हणे भक्तचि नाहीं । कैचा देवहि तये ठायीं ॥४॥