भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकुचि एकला जाला पैं दुसरा

ekuchi ekala jala pain dusara

एकुचि एकला जाला पैं दुसरा । एकीमेकी सुंदरा खेळविती ॥१॥ माझिये कडिये कान्हा तुझिये कडिये कान्हा । देवकी यशोदा विस्मो करिती मना ॥२॥ बापरखुमादेविवरु आवडे मना । जगत्रजिवनु कान्हा बाईयांनो ॥३॥