भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकीं देव अनेकीं देव । नेणेचि भाव पालटों

ekin dev anekin dev | nenechi bhav palaton

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकीं देव अनेकीं देव । नेणेचि भाव पालटों ॥१॥ देवचि भासे धरा मंडळ सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥ अन्न जीवन भूक तहान । देवचि भोजन तृप्तीचें ॥३॥ निळा म्हणे अंगें मनें । जीवे प्राणें देवचि ते ॥४॥