भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकीं असे हेवा । येर अनावडी जीवां

ekin ase heva | yer anavadi jivan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एकीं असे हेवा । येर अनावडी जीवां ॥१॥ देवें केल्या भिन्नजाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥ प्रीतिसाठी भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥ तुका म्हणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥