भजनी मालिका

भजने

एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें । बापुडें ब्राम्हण नागविलें । धाऊनि आलें वोसगांवींचें ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

एका भावें कार्यसिद्धि । एका भावें तुटें उपाधी । एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥ एक भावें करी भजन । एका भावें संतसेवन । एका भावें वेदवचन । पाळीतां तुटे भवपीडा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एका स्तुति एका निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगी लक्ष्मी काय वंदावी । चरणीची गंगा निंदावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एका हरिच्या नामाचिसाठीं । चढला वैकुंठीं गजेद्र पशु ॥१॥ व्दंव्दाचिया महामारी । ओढितां जळचरीं जळा आंत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाहाताती टाळिया ॥१॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें । नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥१॥ वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एकाएकीं एकला काशीवासा गेला । स्वलीला श्रीदत्त स्वयें प्रगटला ॥१॥ दत्त देव आला दत्त देव आला । स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एकाएकीं दैव उदेलें ध्रुवाचें । येणें नारदाचें झालें तेथें ॥१॥ देखियेलें पोर टाकलेंसे वनीं । भावना धरोनी अपसया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥ सबाह्म अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ