भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें

eka bramhanachen gharin khan padilen | satan chorin ek musal nelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें । बापुडें ब्राम्हण नागविलें । धाऊनि आलें वोसगांवींचें ॥१॥ वोसगांवींचा हनुमंत खोटा । त्याचा बाप जुनाट चोरटा । मारूनि नेतो दाहीवाटा । जन चोहटा नागविलें ॥२॥ नागविला चोहाटीचा वाणी । अणिक नेली प्रभुची गोणी । शेळी आली लांडगा घेउनी । गाढव बंदीखानीं बोंबलत ॥३॥ एका संन्याशानें कुतरें खादलें । गांवच्या खाटका प्रायश्चित्त दिल्हें । बापुडे कुंभार नागविले । डोचकें फोडिलें म्हातारीचें ॥४॥ ऐशा सिद्धांतीच्या खुणा । एक जाणे पंढरीराणा । नामा करी विज्ञापना । संत प्रेमळ जाणती ॥५॥