भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका हरिच्या नामेंविण । कली दुर्गम साधन

eka harichya namenvin | kali durgam sadhan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एका हरिच्या नामेंविण । कली दुर्गम साधन ॥१॥ म्हणोनियां न येती मना । करोत जैसी ज्या भावना ॥२॥ आम्हां हरिभक्तां दुषण । छंदे बंद अवलक्षण ॥३॥ निळा नाणूं दृष्टी । ऐसी अभगी करंटी ॥४॥