भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका म्हणता भलें । आणिका सहज चि निंदिलें

eka mhanata bhalen | anika sahaj chi nindilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका म्हणता भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥१॥ कांहीं न करितां सायास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥ बरें वाइटाचें । नाहीं मज कांहीं साचें ॥२॥ तुका म्हणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं ॥३॥