भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका विठठलींचि ठेविला । जिहीं निश्चय आपुला

eka vithathalinchi thevila | jihin nishchay apula

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एका विठठलींचि ठेविला । जिहीं निश्चय आपुला ॥१॥ तेचि विठ्ठल झाले आता । मोह सांडूनियां ममता ॥२॥ देवावीण सहसा कांहीं । दुजें तयां उरलेंचि नाहीं ॥३॥ निळा म्हणे स्वानुभव ल्याले । विठ्ठल चि अंगे होऊनि ठेले ॥४॥