भजनी मालिका

भजने

एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥१॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीत ॥१॥ नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥ मोडूनियां वाटा सूक्षम दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

एका देहामाजीं दोघे पैं वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥ पहा हो समर्थ करी तैसें होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एका नामासाठी । प्रगटतसे कोरडे काष्ठीं । भक्तवचनाची आवडी मोठीं । होय जगजेठी अंकित ॥१॥ एका घरीं उच्छिष्ट काढणें । एका द्वारी द्वारपाळपण करणें । एका घरीं गुरें राखणें । लोणी खाणें चोरुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

एका नामें बहुत तरले । एका भावें जे अनुसरले । एका तुमतेचि ते पावले । एकाएकीं गोविंदा ॥१॥ एका जाणोनियां तुमतें । एका रुसले अहंकारातें । एका विसरोनियां संसारातें । एका सुखातें पावले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा