भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका पासूनियां हरी । घाली आणिका पदरीं

eka pasuniyan hari | ghali anika padarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एका पासूनियां हरी । घाली आणिका पदरीं ॥१॥ ऐसे खेळ याचे निके । खेळे आलके सेलकें ॥२॥ रडवी हांसवी एका । दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥ निळा म्हणे खेळा । नाहीं रुप याच्या ताळा ॥४॥