भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया

eka cha svamiche paik sakal | jaisen bal taisen mol taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥ हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥ पाईकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या ठाव ॥३॥ तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥४॥