भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं

eka arohana nandi | eka garud vahe skandhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥ एका नित्य वास स्मशानीं । एका क्षीरनिधी शयनीं ॥२॥ एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥ एका रुंडमाळा कंठीं शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥ एका जनार्दनीं सारखे । पाहतां आन न दिसे पारखें ॥५॥