भजनी मालिका
← भजनांकडे परत

येतां देखोनियां बाळ। ऋषि धांवला तात्काळ

yetan dekhoniyan bal| rushi dhanvala tatkal

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येतां देखोनियां बाळ। ऋषि धांवला तात्काळ ।।१।। कडे घेऊनि तयाला। ऋषि आश्रमासी आला ।। २ ।। तुझें मायबापीं प्रेम होय पाहोनी आराम।।३॥ सुखें करुनी भोजन। सुवासिन उदकपान | ४ || करुनी क्रमियेलें पंथा। तिहीं सांगितली वार्ता ॥ ५॥ बाळ येतसे मागून । त्याच परामर्श करणें ।।६।। म्हणोनी सारिलें विंदान। पुढें वाढिलें दिव्यान्न ।।७।। रडे मोकलुनी धाय । येथें कल्पांतीं न राहे।।८।। पुढें लागला पंथासी। ऋषि तटस्थ मानसीं ।। ९॥ वदनीं बोट घाली वोजा । ऋषि करितसे चोजा ।।१०।। ऐसें सत्त्वादिकांपुढें । तप खद्योत बापुडें । ११॥ काय करणें ऐशिवांसी । व्यर्थ मुकलों तपासी ||१२|| मार्गी तियें एक झालीं। दासी जनी आनंदली ।।१३।।