भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरीकडे ताराराणी द्विजा घरीं वाहे पाणी

yerikade tararani dvija gharin vahe pani

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येरीकडे ताराराणी द्विजा घरीं वाहे पाणी।।१।। छिद्र पाडोनि रांजणा पाणी त्यामध्यें थारेना ||२|| नानापरीचें गांजणें देती गाळी हो प्रदानें।।३।। पाणी वाहणें कीं खेळां होऊं आली सांजवेळा ॥४॥ काळ कौशिक ब्राह्मणें । नित्य अग्निहोत्र करणें ||५|| रोहिदासा आज्ञा करी। समिधा आणाव्या झडकरी ॥६॥ संगें घेऊनियां गड़ी बना चालिला तांतडी ||७|| धरूनियां सर्पवेष रोहिदासा केला देश||८|| येउनी सांगती मातेस । सर्वे खादलें पुत्रास ।।९।। गेला चंद्र उतरोनी दिसे जैसी म्लान वदनीं ।।१०।। करुणा आली ब्राह्मणासी । जाय सांभाळी पुत्रासी ।।११।। रडे मोकलोनी धाय म्हणे आतां मी करूं काय ॥१२॥ काय करूं आतां कैसें । कोठें गेलें हो पाडस ।।१३।। प्राण राहिला संकटीं करा पाडसाची भेटी ।।१४।। निविड अंधार काळोख दीर्घ स्वरें मारी हांक ।।१५।। ठेचा पाय अडखळत पुढे पावासी लागत ।। १६ ।। बाळ कवळोनी हात। जनी म्हणे शंख करीत ।।१७।।