भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरे येरे माझ्या रामा मनमोहन मेघश्यामा

yere yere majhya rama manamohan meghashyama

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येरे येरे माझ्या रामा मनमोहन मेघश्यामा ||१|| संतमिसें भेटी । देई देई कृपा गोष्टी ।।२।। आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हां देई हो समाधी ॥३॥ जनी म्हणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४।।