भजनी मालिका
← भजनांकडे परत

येग येग विठाबाई

yeg yeg vithabai

येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥ भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥ इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥ माझा रंग तुझिया गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥