भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वामित्रे तत्क्षणीं । सिद्ध आश्रमा येउनी

vishvamitre tatkshanin | siddha ashrama yeuni

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विश्वामित्रे तत्क्षणीं । सिद्ध आश्रमा येउनी ।।१।। बैसे येउनी आश्रमासी करी मातंग यागासी ॥२॥ सहस्र अवदान आहुती। होतां प्रगटली शक्ति ।।३।। विश्वामित्रे तये वेळे । देवी वरदानाचे बळें ॥४॥ व्याघ्र हिंडती रानें रानें बंद केलें येणें जाणें ॥५॥ कृपा न जाती कृषिक तीर्थयात्रेसी पांथिक ।।६।। धेनु न जाती बनासी बाट नाहीं वेव्हारासी ||७|| प्रजा जाऊन राजसमे हात जोडोनियां उभे ॥८॥ ऐसी प्रजेची है वाणी राजा विचारितो मनीं ||९|| गुरुवचन धरिता चित्तीं माझी होईल अपकीर्ति ।।१०।। राव निवाला स्वारीसी । म्हणे नामयाची दासी ।।११।।