भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण

vishvamitra dvijachinha | svapnin pragate apan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण ।।१।। देखोनियां द्विजवरातें नमियेलें जोडुनी हातें ॥२॥ राव बोले उदारपणीं । काय इच्छा आहे मनीं ।। ३।। दयावंत धर्ममूर्ती तुझी तिहीं लोकीं कीर्ति ।।४।। अंकुश कडिया लेखणी। राया वोपी माझ्या पाणी ॥५॥ उदारपणें देसी जरी उदक घालीं माझे करीं।।६।। कृपा करुनी आम्हांवरी। आलें पाहिजे नगरीं ।।७।। येथें संकल्पावांचून । नाहीं होत माझें येणं ।।८।। रायें घेऊन जीवन। ऋषिहस्तकीं घालून ||९|| एक नवल देखे दृष्टी काळपुरुष उभा पार्टी।।१०।। लोहदंड घेउनी करीं । घालूं पाहे त्याचे शिरीं ।। ११।। तेणें झाला भयाभीत। राव स्वप्नांत बरळत ||१२|| राव बैसला उठोन करी देवाचें स्मरण ।।१३।। तारामती पुसे राया। कांहो बरळलां स्वामिया ||१४|| राज्यदान सुकृतकोटी । एक काळपुरुष पाठीं ।।१५।। लोहदंड घेऊन कीं। पालूं पाहे माझे शिरी।।१६।। ये म्हणे या जीवनीं करा स्नानातें जाउनी ।।१७।। अग्निमुखीं द्यावें दान स्वप्नदोष नासती जाण ।।१८।। म्हणे प्रधान महाराजा दान करा कांहीं द्विजा ।। १९।। ऐसें बोलतां वचन आला विश्वामित्र जाण ||२०|| राजा बोले कर जोडून । शयनीं देखियेलें स्वप्न ।। २१ ।। ह्याच स्वरूपा प्रमाण ऐसा देखिला ब्राह्मण||२२|| सिंहासन समेदिनी । राया दे गा मजलागोनि ।। २३॥ आतां मार्गे दक्षणेसी म्हणे नामयाची दासी ||२४||