भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती

vaishnav to ek itar tin songen| use deuni angen chitariti

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें। उसे देउनी अंगें चितारिती ॥१॥ जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरूप केला देशधडी ॥२॥ नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी अखंड द्वेष करी सज्जनांचा॥३॥ विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन। पाखांडी हे म्हणे करिती काई ||४|| पंचरस पात्रा कांता है बुडविती । उद्धरलों म्हणती आम्ही संत ॥५॥ कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥ वैष्णव तो एक चोखामेळा महार जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥