भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला

utha panduranga prabhatasamayo patala

उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारी पातला ||१|| वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची दादी उभे जोडूनि हात ।। २॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडाआडूनि पाहताती जगजेठी ||३|| सुरवरांची विमानें गगनीं दाटलीं सकळ। रखुमाबाई माते वेगीं उठवा घननीळ ||४|| रंभादिक नाचती उभ्या जोडुनि हात। त्रिशूळ डमरू घेउनि आला गिरजेचा कांत ॥ ॥५॥ पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥६॥ अनंत अवतार घेसी भक्ताकारणें कनवाळु कृपालु दीनालागीं उद्धरणें ।।७।।