भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं

tujhe charanin ghalin mithi | chad nahin re vaikunthin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ।।१।। सर्वभावें गाईन नाम। सखा तूंचि आत्माराम ||२| नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥ रूप न्याहाळीन दृष्टी सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥ ४ ॥ दीनानाथा चक्रपाणी दासी जनी लावी ध्यानीं॥५॥