भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो हा भक्तांचे तोडरीं । वाचें उच्चारितां हरी

to ha bhaktanche todarin | vachen uchcharitan hari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तो हा भक्तांचे तोडरीं । वाचें उच्चारितां हरी ॥१॥ काम होऊनि निष्काम। काम भावभक्ति प्रेम ॥२॥ तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय । ॥३॥ काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥ ४ ॥