भजनी मालिका
← भजनांकडे परत

थालीपाक ऐकतां । हरि वारी जन्मव्यथा

thalipak aikatan | hari vari janmavyatha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
थालीपाक ऐकतां । हरि वारी जन्मव्यथा ।। १ ।। दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी।।२।। सेवें बहुत तोषविला वर माग तूं इच्छिला ||३|| शिष्यांसह रानीं जायें। इच्छाभोजन मागावें ।।४।। नंतर शाप द्यावा । आतां जातों वर द्यावा ॥५॥ हर हर शब्द थोर केला झाला वनांत गलबला ॥ ६ ॥ नवल सर्वासी वाटलें जनी म्हणे ऋषी आले।।७।।