भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला

sundar majhen jaten ge phire bahutek ovya gaun kautuke tun mere ba viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सुंदर माझें जातें गे फिरे बहुतेक ओव्या गाऊं कौतुके तूं मेरे बा विठ्ठला ।।१।। जीवशिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे। लावुनी पांचीं बोटें गे तूं येरे बा विठ्ठला ।। २ ।। सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा, तू येरे बा विठ्ठला ||३|| बारा सोळा गडणी, अवघ्या कामिनी ओव्या गाऊं बसूनि तूं येरे बा विठ्ठला ।।४।। प्रपंचदळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढे ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥ सत्त्वाचें आधण ठेविलें पुण्य वैरिलें पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठला ॥ ६ ॥ जनी जातें गाइल कीर्त राहिल। थोडासा लाभ होईल तूं पर बाबा ||७||