भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज

sharir hen jayachen nashvar anikanchen| mhanal jari tyachen kay kaj

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें। म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥ आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला पुढे तेणें उमविला दुजा एकू ।।२।। समूळ साल माया सांडूनियां दिजे। परि अहं बीज जतन करा ।।३।। तें बीज भाजोनि करा ओवाळणी संतांचे चरणीं समूळ देह ||४|| पुढे त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलांची ||५|| आहे नाहीं देह घरी ऐसा भाव म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥