भजनी मालिका
← भजनांकडे परत

शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे

shabdachen brahma laukiki ho dise | jaise te phanse maindanche

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥ स्वयें सुखें धाला आपणातें विसरला । तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥ नामयाची जनी सागरीं मिळाली । परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥