भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेना न्हावी भक्त मला तेणें देव भुलविला

sena nhavi bhakta mala tenen dev bhulavila

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सेना न्हावी भक्त मला तेणें देव भुलविला ॥ १ ॥ नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी।।२।। रूप पालटोनि गेला। सेना न्हावी विठ्ठल झाला ॥३॥ काखें घेउनी धोकटी गेला राजियाचे भेटी ।।४।। आपुलेहातेंभारघालीराजियाचीसेवाकेली||५|| विसरतोपडलारामा। कायकरूंमेघश्यामा||६|| राजा अयनियांत पाहे । चतुर्भुज उभा राहे ।।७।। दूत धाडूनियां नेला। राजियानें बोलाविला ॥८॥ राजाबोलेप्रीतिकर। रात्रीसेवाकेलीफार||९|| राजसदनाप्रती न्यावें । भीतरींच घेउनी जावें।।१०।। आतां बरा विचार नाहीं। सेना म्हणे करूं काई ।।११।। सेना न्हावी गौरविला राजियानें मान दिला।।१२।। कितीकांचा शीण गेला । जनी म्हणे न्हावी झाला ।।१३।।