भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत राउळा चालिले । ज्ञानेश्वर तंव बोले

sant raula chalile | dnyaneshvar tanv bole

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संत राउळा चालिले । ज्ञानेश्वर तंव बोले ॥१॥ एवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद ल्याहावें ॥२॥ पाय जोडुनी विटेवरी । कटीं हात उभा हरी ॥३॥ रुप सांवळें सुंदर । कानीं कुंडल मनोहर ॥४॥ सोनसळा वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥५॥ गरुडपारीं सन्मुख उभा । जनी म्हणे धन्य शोभा ॥६॥