भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये

sant he kon tari devache he dole| pujevin andhale devachiye

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे। पूजेविण आंधळे देवाचिये ।।१।। कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे। यासाठी आवडे संत करी ॥२॥ संत ऐसे करी देवाचे कान सांडियेल्या ध्यान कोण ऐके।।३।। संत घुसती तरी देवाचे ते पाय आगमा न गमे सोय मागाडीये ||४|| संत पुससी तरी देवाचें तें पोट धरूनियां बोट दाविती हरी।।५।। संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ।।६।। संत जरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ||७|| पराविया चारी सांडूनि मीपणीं संता बोले वाणी विठोबाची ||८|| परेचिया चारी आनंदामाझारी संत झाले अंतरी पडजीभ देवा ||१|| क्षस्ते नासिलें अक्षर तें काढिलें । निःशब्दाचें झालें बोले संत।। १०॥ शब्द तो उडाला नाद तो बुडाला भेद तो आटला माया भावीं ।।११।। विठो बटावरी पारविया झाले केश ते वाढले माय संत ।।१२।। कुरळ होऊनियां देती ते सुदा म्हणे जनी वोवाळ जीवैभावें॥१३॥