भजनी मालिका
← भजनांकडे परत

सख्या घेतलें पदरीं। आतां न टांकावें दुरी

sakhya ghetalen padarin| atan na tankaven duri

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सख्या घेतलें पदरीं। आतां न टांकावें दुरी ॥ १ ॥ थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥ ब्रह्मयाच्या ताता। सज्जना लक्षुमीच्या कांता ।।३॥ आपुली म्हणवूनि आण गावी दासी जनी ॥४॥