भजनी मालिका
← भजनांकडे परत

रामयाची कन्या गोरटी गोवळी

ramayachi kanya gorati govali

रचनाकार: संत नागरी · अभंग
रामयाची कन्या गोरटी गोवळी। बापे बोळविली सासुरिया । सवे दिधली दासी घरीची आंदणी ।। बाळ सांगातिणी आवडती ।।१।। दिव्य त्याचे दुःख नाठवे त्या चित्ती । उदंड विश्रांती रामनामे ॥धृ॥ आता सासुरवासी आनंदचि मनी । मांडिती अंगणी हाचि खेळ । तुळशी वृंदावने चौक रंगमाला । संभ्रम सोहळा देव पूजा ||२|| करुनि मृत्तिकेची पांडुरंगमूर्ती ।। तियेसी खेळती भावबळे । इति रसरंग पूजा पुनस्कार। करिती उपचार आवडीचे ॥३॥ करुनी प्रदक्षिणा लोटांगण येती । देव एकी देती आळिंगणे । विठ्ठल विठ्ठल म्हणवुनि नामे वाती ताली । वंदिती पायधुळी येरवेरीचे ||४|| कान धरूनि पुढे नाचती आनंदे । संती पदबंधे सरळवरळ । नयनाचेनि नयन देखिले रुपडे । क्षण घाडी न पडे विसरू त्याचा ||५|| आपुले निरंगे खेळती परवडी । जे जीवी आवडी बैसलीसे । भक्तीचा गौरव भजनाचे वैभव । जो होता अनुभव केला मने ||६|| भक्ति शिरोमणी त्या बालयोगिणी । जन्मांतरीच्या दोन्ही योगभ्रष्टा । नेणति नी मने प्रेमे एकविधे । नागरी स्वानंदे ओसंडली ||७||