भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिक भक्तबळी विठू आणिला भूतळीं

pundalik bhaktabali vithu anila bhutalin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुंडलिक भक्तबळी विठू आणिला भूतळीं ॥१॥ अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ॥२॥ वसुदेवा न कळे पार नाम्यासवें जेवी फार ॥३॥ भक्त भावार्था विकला। दासी जनीला आनंद झाला ॥४॥