भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी काय या दोन्हीपणी वेगळीक

pani tenchi megh megh tenchi pani kay ya donhipani vegalik

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी काय या दोन्हीपणी वेगळीक।।१।। माती तेचि धूळ धूळ तेचि माती। भेंडा आणि भिंती काय दोन॥२॥ साखरी गोडी गोडी साखरेसी थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥ डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा। शांति ज्ञानकळा काय मिन्न ||४|| वदन ते ओठ ओठ ते वदन। क्षेम आलिंगन काय दोन ॥ ५॥ जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ आशा आणि लोभ काय दोन ॥६॥ संत तेचि देव देव तोचि संत म्हणे जनी मात गोष्टी भिन्न ।।७।।