भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें

padak viththalachen gelen | brahman mhanati janinen nelen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ।।१।। अगेशिंपियाचेजनीनेलेंपदकदेआणुनी||२|| देवासमोर तुझे घर तुझें येणें निरंतर ॥२॥ म्यां नेलें नाहीं जाण सख्या विठोबाची आण ।।४।। धोतर झाडूनि पाहती। पडलें पदक घेऊनि जाती ।।५॥ जनीवरी आली चोरी। ब्राह्मण करिती मारामारी॥६॥ धांविनले चाळीस गडी जनीवरी पडली उडी ।।७।। दंडीं लाविल्या काढण्या । विठोबा धांवरे धांवण्या ॥८॥ चंद्रभागे रोविला शूळ जनाबाईस आलें मूळ ॥१॥ हात टाळी वाजविती । मुखीं विठ्ठल बोलती ।। १० ।। विलंब लागला ते वेळीं । म्हणती जनिला द्यारे सुळीं ।।११।। ऐसा येळकोट केला। जनी म्हणे विठो मेला।।१२।। तं मुळाचें झालें पाणी धन्य म्हणे दासी जनी ।।१३।।