भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदक माळा सकलादे। तेथें टाकिली गोविंदें

padak mala sakalade| tethen takili govinden

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पदक माळा सकलादे। तेथें टाकिली गोविंदें ।।१।। देव तांतडी निघाले। वाकळ घेउनी पळाले ॥२॥ भक्त येती महाद्वारीं। चोर पडले देव्हारीं ।।३।। नवल झालें पंढरपुरी देव राबे दासी घरीं ॥४॥ त्रिभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥