भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं केली तुझी सेवा दुःख वाटतसे माझे जिवा

nahin keli tujhi seva duhkh vatatase majhe jiva

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नाहीं केली तुझी सेवा दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥ नट पापीण मी हीन नाहीं केलें तुझे ध्यान ॥ २॥ जें जें दुःख झालें मला तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥ ३ ॥ रात्रंदिवस मजपाशीं दळूं कां लागलासी ।।४।। क्षमा करावी देवराया दासी जनी लागे पार्या ॥५॥