भजनी मालिका
← भजनांकडे परत

माय मेली बाप मेला आतां सांभाळी विठ्ठला

may meli bap mela atan sambhali viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माय मेली बाप मेला आतां सांभाळी विठ्ठला ॥ १॥ मी तुझें गा लेंकरूं नको मजशी अव्हेरूं ॥२॥ मतिमंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥ तुजविण सखे कोण माझें करील संरक्षण ॥४॥ अंत किती पाहासी देवा। थोर श्रम झाला जीवा ॥५॥ सकल जीवाच्या जीवना म्हणे जनी नारायणा ॥६॥