भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं

majhiye janani harini | guntalis kavane vanin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं॥१॥ मुकें तुझें मी पाडस चुकलें माये पाहे त्यास ॥२॥ चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥ आतां भेटवा जननी। विनवितसे दासी जनी ॥४॥