भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें अचडें बचडें छकुडें गे राधे रूपडें पांघरूं घालीत कुंचडें ।।धृ

majhen achaden bachaden chhakuden ge radhe rupaden pangharun ghalit kunchaden ||dhru

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझें अचडें बचडें छकुडें गे राधे रूपडें पांघरूं घालीत कुंचडें ।।धृ।। हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा पानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥ हरि माझा गे नेणता करी त्रिभुवनाथा पाँगता जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥ ऐसे देवाजीचे गड़ी। पेंद्या सुदामाची जोडी बलिभद्र त्याचा गडी ॥३॥ जनी म्हणे तूं चक्रपाणी खेळ खेळतो वृंदावनीं लुब्ध झाल्या त्या गौळणी ।।४॥