भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला

majha shinabhag gela | tuj pahatan viththala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला॥१॥ पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं॥२॥ अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तथा विघ्न ॥३॥ जनी म्हणे हरिहर भजतां वैकुंठीं त्या घर॥४॥