भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं

majha nama maj dei jiv dein tujhe payin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया चाळा केलें ॥२॥ तें गा न चले मजपाशीं दे गा माझ्या नामयासी ॥३॥ तुझ्यासंगें जे जे गेले ते त्वां जितेंचि मारिले ||४|| विठ्ठल म्हणे गोणाबाई नामा तुझा घेवोनियां जाई||५|| हातीं धरोनियां आली दासी जनी आनंदली ॥६॥