भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं

kone eke divashin | vitho gela janipashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं ॥१॥ हळूच मागतो खायासी । काय देऊं बा मी तुसी ॥२॥ हातीं धरुन नेला आंत । वाढी पंचामृत भात ॥३॥ प्रेमसुखाचा ढेंकर दिला । जनी म्हणे विठो धाला ॥४॥