भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर पसरिला भगवंतें। घाली द्रौपदी देंठाते

kar pasarila bhagavanten| ghali draupadi denthate

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कर पसरिला भगवंतें। घाली द्रौपदी देंठाते।॥१॥ म्हणे पावो विश्वंभर बोले द्रौपदी सुंदर ||२|| देतां तृप्तीचा टेंकर थालें त्रैलोक्य अपार ||३|| दावी कौतुक श्रीपती पर्वत अन्नाचे पाहाती ॥४॥ उष्ण घवघवीत कैसी वाफां उठती आकाशीं ॥५॥ नाना परिचीं दिव्या डोळां दावी नारायणें ॥६॥ चोज सर्वांचिया मनीं म्हणे नामयाची जनी ॥७॥