भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा न येसी विठ्ठला ऐसा कोण दोष मला

kan ga na yesi viththala aisa kon dosh mala

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कां गा न येसी विठ्ठला ऐसा कोण दोष मला ॥१॥ मायबाप तूंचि धनी मला सांभाळी निर्वाणीं।।२।। त्वां वा उद्धरिलें थोर । तेथे किती मी पामर ॥ ३॥ दीनानाथा दीनबंधु । जनी म्हणे कृपासिंधू ॥४॥